मुंबई इंडिअन्स खेळाडूंसाठी चार दिवस मस्ती कि पाठशाला

mumbaiindi
मुंबई इंडिअन्स संघतूनत आयपीएलमध्ये खेळत असलेल्या खेळाडूना चार दिवस काय वाट्टेल ते करा पण बॅटबॉलला शिवू देखील नका अशी सूचना दिली गेली असून कालपासून हे खेळाडू मौज मस्ती मध्ये रमले आहेत. आयपीएलच्या १२ व्या सिझन मधील अंतिम टप्पा आता सुरु होत असून या महत्वाच्या सामन्यात खेळाडूंनी त्यांचे बेस्ट ते १०० टक्के द्यावे यासाठी त्यांना चार दिवसाची पूर्ण सुट्टी दिली गेली आहे. आयपीएल नंतर लगेचच वर्ल्ड कप सुरु होत आहे. टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली नेहमीच त्याच्या खेळाडूना वर्क लोड काळजीपूर्वक मॅनेज करण्याचा सल्ला देत असतो. मुंबई इंडिअन्समधून रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप साठी निवडले गेले आहेत.

मुंबई इंडिअन्सच्या सूत्रांकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार त्यांना खेळाडू महत्वाचे असून त्यांना प्राथमिकता दिली गेली आहे. त्यामुळे त्यांनी मध्ये मिळालेल्या चार दिवसात विश्रांती घ्यावी, कुटुंबासह वेळ काढावा आणि आनंद लुटावा असा विचार केला गेला. या संघाची २५ एप्रिल रोजी चेन्नई विरुद्ध मॅच आहे. शिवाय वर्ल्ड कप साठी ते ताजेतवाने राहायला हवेत. मुंबई संघात रोहित, बुमराह आणि हार्दिक आहेत तसेच डी कॉक, लसिथ मलिंगा व अन्य परदेशी खेळाडूही आहेत. या खेळाडूनाही त्यांच्या देशासाठी वर्ल्ड कप खेळायचा आहे. म्हणून चार दिवसांची ही सुट्टी दिली गेली आहे. बहुतेक परदेशी खेळाडू चेन्नईला रवाना झाले आहेत. तर बाकी घरी गेले आहेत. अर्थात तत्पूर्वी त्यांनी हॉटेलमध्ये जलतरण तलावात दंगमस्ती केल्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

Leave a Comment