तुटकी पाने कलेने जिवंत करणारा अनोखा कलाकार

kanat
कझाकिस्तान मधील कनत नर्तेजीन हा कलाकार सध्या सोशल मिडीयावर खूपच गाजत आहे कारण त्याने त्याच्या कलेले झाडाच्या तुटक्या पानांना जणू जिवंत करण्याचे काम हाती घेतले आहे. तुटलेली ही पाणी कनतच्या कलाकारीने अधिक सुंदर, देखणी आणि लोभस बनत आहेत. जणू ती नवी कहाणी सांगत आहेत. गेली चार वर्षे कनत झाडाच्या पानांवर विविध प्रतिमा कोरून काढतो आहे आणि त्याचे फोटो इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर करतो आहे. कनतचे आता १० हजार फॉलोअर्स असून त्याच्या खास कलेला सोशल मिडीयावर खासी लोकप्रियता लाभली आहे.

leaves
कनत सांगतो हंड्रेड मेथड्स ऑफ ड्राँइंग नावाचा प्रोजेक्ट सुरु झाला आणि त्यात विविध कलांचा शोध घेताना कनतला ही कल्पना सुचली. तेव्हा त्याने झाडाची पाने अतिशय कल्पकतेने कापून त्यातून नजर ठरणार नाही अश्या कलाकृती निर्माण केल्या आणि अजूनही करतो आहे. ब्लेडच्या सहाय्याने तो हे काम करतो. त्यासाठी प्रथम योग्य पानाचा शोध तो घेतो. ते कागदावर चिकटवितो त्यामुळे पान दीर्घकाळ टिकते.

kanat1
या नंतर कनत त्याची अनोखी कला म्हणजे विविध प्रकारचा प्रतिमा त्यावर कुशलतेने कोरतो. यातून प्रामुख्याने सकारात्मक संदेश देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. माणसाला आनंद देतील अश्या कलाकृती तो अतिशय हळुवारपणे या पानांवर कोरतो आणि तयार होते एक अफलातून कलाकृती ज्यावर नजर खिळून राहते. कनतने यासाठी भारतापासून अनेक देशातील प्रतिमा निवडल्या आहेत. त्याला देश धर्माचे बंधन नाही. क्रिसमस सेलेब्रेशन, शॉपिंग करणारी मुलगी, ताजमहाल, कुत्र्याचे पिलू अश्या अनेक प्रतिमा त्याने तयार केल्या आहेत.

Leave a Comment