आईचा आशीर्वाद घेऊन मोदींनी केले मतदान

hiraben
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेसाठी होत असलेल्या तिसऱ्या टप्प्यात त्यांच्या गांधीनगर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांनी गांधीनगर येथील घरी जाऊन आई हिराबेन यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. पंतप्रधान जेव्हा गुजराथ मध्ये येतात तेव्हा तेव्हा ती आई हिराबेन याची भेट घेतात. हिराबेन यांनी मोदींना आशीर्वाद देताना त्यांना नारळ व ५०० रुपये दिले. त्यानंतर उघड्या जीप मधून पंतप्रधान त्यांच्या रानिप मतदार्केंद्रावर पोहोचले आणि सकाळी लवकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. गांधीनगर मधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रिंगणात आहेत.

vote
मतदान केल्यावर मोदी म्हणाले, कुंभ मेळ्यात स्नान केल्यावर ज्याप्रमाणे पवित्र वाटते तोच अनुभव लोकशाहीतील या महापर्वात मतदान केल्यावर येतो. यावेळी पंतप्रधानांनी देशातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. मोदी वाराणसी मधून निवडणूक लढविणार असून २६ तारखेला ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Leave a Comment