राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेला परवानगी

raj-thakre
मुंबई – आता मुंबईतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘लाव रे तो व्हिडिओ’चा आवाज ऐकायला येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना महापालिकेने मुंबईत पहिली सभा घेण्यास परवानगी दिली आहे. पण २४ एप्रिलऐवजी राज यांना २३ एप्रिलला सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात ही सभा होणार आहे.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी मुंबईत २४ एप्रिलला परवानगी मिळावी, यासाठी मनसेने परवानगी मागितली होती. पण मनसे निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. लोकसभेच्या उमेदवारांना हा सर्व गोंधळ विविध परवानग्यांसाठी असललेल्या एक खिडकी योजनेमुळे झाला होता. मनसेचा अर्ज एक खिडकी योजनेनुसार दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला होता. पण संबंधित अधिकाऱ्याने मनसेचा उमेदवार नसल्याने परवानगी नाकारली होती.

राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर राज ठाकरेंनी घेतलेल्या सभेची चांगलीच चर्चा सुरू आहे. अशात ठाकरेंच्या सभेची तोफ मुंबईतही धडाडणार आहे. भाजपच्या कोणत्या योजनेवर या सभेत राज ठाकरे निशाणा साधणार याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

Leave a Comment