कोलकाता – सोमवारी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची पाठराखण करत हिंदू दहशतवादाच्या नावाखाली साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. जगात देशाच्या संस्कृतीला याद्वारे बदनाम करण्यात आले. न्यायालयात त्यांचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले असे म्हटले आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची अमित शहांकडून पाठराखण
शहा म्हणाले, खोटे खटले दाखल करुन स्वामी असीमानंद आणि इतर लोकांना आरोपी बनवण्यात आले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडण्यात आले होते त्यांना का सोडण्यात आले, असा सवालही त्यांनी यावेळी केला. ममता दीदींना दोन टप्प्यातील निवडणुकांनंतरच त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसत असल्यामुळे त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये यंदा परिवर्तन होणारच, अशा शब्दांत शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले, ते निवडणूक आयोगावर आणि विरोधकांवर पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच टीका करीत आहेत. आमच्या नेत्यांच्या सभांना परवानगी न देणाऱ्या ममता दीदींनाच आता येथील जनतेनेच नाकारले आहे. त्यांच्या सभांना गर्दी होत नाही, त्यामुळे आता त्या मतदारांच्या मनात भिती निर्माण करण्याचा हरऐक प्रयत्न करीत आहेत.