मर्सिडिजसह बीएमडब्ल्यू कार भाड्याने देणार ओला!

OLA
नवी दिल्ली – विविध प्रकारच्या कार या प्रवाशांना ओलाकडून भाड्याने दिल्या जातात. सध्या ऑडी, मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूबरोबर करार करण्यासाठी ही कंपनी प्राथमिक स्तरावर चर्चा करत आहे. ग्राहकांना स्वत: ला चालविण्यासाठी मर्सिडिजसह बीएमडब्ल्यू कार हा करार झाल्यास भाड्याने मिळू शकणार आहेत.

सध्या बंगळुरू शहरात ओला प्रायोगिक तत्वावर सेल्फ ड्राईव्ह सेवा देत आहे. या सेवेनुसार तुम्हाला भाड्याने घेतलेली कार चालविता येते. या सेवेसाठी ५० कोटी डॉलरची गुंतवणूक होईल, अशी ओलाला अपेक्षा आहे. ओला कंपनी ऑडी, मर्सिडिज आणि बीएमडब्ल्यूबरोबर चर्चा करत आहे. मासिक भाडे तत्वावर ग्राहकांना या आलिशान कार देण्याचा ओलाचा प्रयत्न आहे. सध्या अमेरिकेत या पद्धतीची सेवा आहे. मात्र महागड्या कारची सेवा भारतात ग्राहकांना परवडणार नाही, असा अंदाज सूत्राने व्यक्त केला आहे. तरीही ओला कंपनी ही सेवा विविध शहरात देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सूत्राने सांगितले.

ओबेर कंपनीबरोबर भारतात तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेत ओलाची तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे ओलाने जेवणासह खाद्यपदार्थ घरपोहोच पोहोचविण्याची सेवा फूडपांडा कंपनीबरोबर सुरू केली आहे. नुकताच हुंदाई आणि किया या कंपन्यांनी ३० कोटी डॉलरची ओलामध्ये गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी ओलामध्ये ६५० कोटींची गुंतवणूक फेब्रुवारीमध्ये केली आहे. तसेच ओलाच्या ईलेक्ट्रिक मोबॅलिटीमध्ये टायगर ग्लोबल आणि मॅट्रिक्स इंडिया या कंपन्यांनी ४०० कोटींची गुंतवणूक केली आहे.