बाबरी मशिद पाडण्यात माझा ही सहभाग – प्रज्ञा सिंह

sadhavi-pragya
भोपाळ – मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आणि भाजपच्या भोपाळ येथील उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बाबरी मशीद मी पाडायला गेले होते. मी देखील राम मंदिर बांधण्याच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. मला ते बनविण्यापासून कोणीही रोखू शकत नसल्याचे म्हटले आहे. त्यांना यासंबंधी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

मध्यप्रदेशातील भोपाळ येथे प्रज्ञा सिंह ठाकूर बोलत होत्या. राम मंदिर आंदोलनाबाबत यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, की अयोध्येत मी गेले होते. हे मी नाकारत नाही. बाबरी पाडण्यात मी देखील सहभाग घेतला. तसेच, मी राम मंदिर आंदोलनातही सहभागी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. राम मंदिर बांधण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही. राम हेच राष्ट्र आहे आणि राष्ट्र हेच राम असल्याचे प्रज्ञा सिंह म्हणाल्या.

त्यांना निवडणूक आयोगाने बाबरी मशीद पाडण्याच्या वक्तव्यावर नोटीस बजावली आहे. यावर एका दिवसात स्पष्टीकरण देण्यास त्यांना बजावण्यात आले आहे. प्रज्ञा सिंग यावर काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

Leave a Comment