कन्हैया सामान्य जनतेच्या समस्या आणि आवाज संसदेत पोहचवेल – प्रकाश राज

prakash-raj
पाटणा – सीपीआयकडून जेएनयूचा विद्यार्थी कन्हैया कुमार लोकसभेची निवडणूक लढवत असून बॉलीवूड अभिनेते प्रकाश राज यानिमित्ताने बेगूसराय येथे कन्हैया कुमारचा प्रचार करण्यासाठी पोहचले आहेत. प्रकाश राज यावेळी म्हणाले, भारताचा मी सुद्धा रहिवासी असून कन्हैया कुमार देशाचा बुलंद आवाज आहे. कन्हैयासारख्या लोकांची संसदेत गरज आहे.

प्रकाश राज म्हणाले, या देशाचा कन्हैया मुलगा आहे. मी कन्हैयाचा प्रचार करण्यासाठी यामुळे आलो आहे. कोणाचा विरोध करण्यासाठी ही निवडणूक नाही. जनतेची ही निवडणूक आहे. कोणाला शिव्या देण्याची गरज नाही. सामान्य जनतेच्या समस्या आणि आवाज कन्हैया संसदेत पोहचवेल.

कोणता नेता किंवा पक्ष निवडणुकीत जिंकत नाही. योग्य उमेदवाराची जर निवड झाली तर जनतेचा विजय होतो. निवडणूक ही यासाठी जनतेच्या विजयाचा किंवा पराभवाचा प्रश्न आहे. बेगूसरायमधील लोकांमध्ये कमालीची उत्साह आहे. येथील लोकांनी मला खूप प्रेम दिले आहे. यामुळे मी आनंदी आहे, असेही ते प्रचाराच्यावेळी म्हणाले.

Leave a Comment