भारतीय टपाल खाते ठरणार ‘जगातील सर्वात मोठे ई-पोस्टल नेटवर्क’

india-post
नवी दिल्ली – देशातील दीड लाख टपाल कार्यालयांचे टाटा कन्सलटन्सी ही आयटी कंपनी आधुनिकीकरण करणार आहे. भारतीय पोस्ट हे यामुळे सर्वात मोठे ई-पोस्टल नेटवर्क असणारे टपाल ठरणार आहे.

२०१३ मध्ये पोस्ट कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यासाठी टीसीएसला १ हजार १०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. पोस्ट कार्यालयात या कंत्राटानुसार माहिती तंत्रज्ञान यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. पोस्ट कार्यालयात आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्यामुळे पोस्ट कार्यालये ग्राहकांना अधिक प्रभावी सुविधा देऊ शकणार आहेत.

कोअर सिस्टीम इंटिग्रेशन (सीएसआय) पोस्ट कार्यालयात बसविली जाणार आहे. टीसीएसकडून याची रचना आणि अंमलबजावणी ही केली जाणार आहे. दीड लाख पोस्ट कार्यालयांतील वित्त, मनुष्यबळ, लेखा परीक्षण इत्यादी विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ईआरपी सोल्यूशन देण्यात येणार आहे.

तंत्रज्ञानाचे या व्यवस्थेतून ५ लाख कर्मचारी, ४० हजार विविध सेवांचे ग्राहक आणि ३० लाखांचे रोजचे व्यवहार यांना सहकार्य मिळणार आहे. पोस्ट कार्यालयांच्या माध्यमातून दुर्गम भागातही सेवा देणे आणि अर्थसमावेशकता देशभरात वाढविणे हा आधुनिकीकरणाचा मुख्य हेतू आहे.

Leave a Comment