तुम्ही ऐकल्या आहेत का रामदास आठवलेंच्या यांच्या काव्यात्मक घोषणा

ramdas-aathwale
नाशिक : नेहमीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कवितांनी हास्याचे कारंजे उठतात. आठवले यांनी दिंडोरी मतदारसंघातील पिंपळगावातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी नेहमीप्रमाणेच काही काव्यात्मक घोषणा दिल्या. सभास्थळी यामुळे एकच हशा पिकला होता.

काही नेत्यांची नरेंद्र मोदी येण्यापूर्वी भाषणे झाली. रामदास आठवले यांचेही यावेळी भाषण झाले. नेहमी वेगळ्या धाटणीचे भाषण देण्यात पटाईत असलेले आठवलेंनी यावेळीही कविता करत मोदींची स्तुती केली. तसेच काही घोषणाही त्यांनी उपस्थितांना ऐकविल्या.

नरेंद्र मोदी चौकीदार, राहुल गांधी भागीदार; नरेंद्र मोदी विकासपुरुष, राहुल गांधी भकासपुरुष; नरेंद्र मोदी फकीर हैं, राहुल गांधी अमीरो की लकीर हैं; आमच्याकडे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची आहे जंत्री, म्हणून मोदी होणार पुन्हा प्रधानमंत्री…असे म्हणत नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी या त्यांच्या प्रत्येक काव्यपंक्तीला उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासोबत सद्सद् विवेकबुद्धी देखील राहिलेली नाही, असा आरोप केला. तर भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगवास भोगला, असे सांगून भुजबळांना टोला हाणला.

Leave a Comment