या कारणामुळे नागरिकाने स्विकारला शिख धर्म

pat-singh
तुम्ही शिख संप्रदायातील अनेकजणांचे फोटो पाहिले असतीलच पण आम्ही जे फोटो दाखवत आहोत त्या काहीतरी वेगळे तुम्हाला दिसत असेल. पत सिंह चेऊंगचे हे फोटो आहेत. तो चीनचा नागरिक असून त्याने आता शिख धर्म स्विकारला आहे. जगभरात शिख धर्माची ओळख सेवा भावशी संबंधित अशीच आहे. शिख धर्म आता एका चीनी नागरिकाने स्विकारल म्हटल्यावर लोकांना वेगवेगळे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.
pat-singh1
पत सिंह हा सध्या कॅनडामध्ये राहतो. त्याने सांगितले की, त्याचं शिख धर्म स्विकारण्याचा एकमेव कारण म्हणजे लोकांची सेवा करणं. पत या धर्माशी जोडला गेल्यानंतर ‘गुरुनानक फ्री किचन’ संस्थेशी जुळला. ही संस्था दर रविवारी गरीब लहान मुला-मुलींना मोफत जेवण देते.
pat-singh2
आता पगडी सुद्धा पत सिंह बांधतो. केस तो कापत नाही, त्याचबरोबर दाढी सुद्धा कापत नाही. रोज सकाळी 3.30 वाजता तो उठतो. नंतर धावायला जातो, नंतर गुरुद्वाऱ्यात जातो. पूजा-पाठ करतो. पत व्यवसायाने एक फोटोग्राफर आहे. तो सांगतो की, शिख धर्माशी जोडला गेल्यानंतर त्याने लोकांची मदत करणे सुरु केले. लोकांची मदत करणे हीच शिख असण्याची ओळख आहे.

Leave a Comment