श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा २९० वर

blast
नवी दिल्ली – ईस्टर संडेदिवशी श्रीलंकेत कोलंबोतील चर्चमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर सर्वच देशांना हादरा बसला होता. यानंतर कोलंबो विमानतळावर आज (सोमवार) सकाळी आणखी एक बॉम्ब सापडला आहे. हा बॉम्ब निकामी करण्यात आला असून २९० वर या स्फोटांमध्ये मृतांचा आकडा पोहेचला आहे. तर, ५०० जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली.

३ भारतीयांचा देखील मृतांमध्ये समावेश असल्याचे भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. हे बॉम्बस्फोट कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये घडवण्यात आले. भारताने कोणत्याही प्रकारच्या मानवीय सहाय्याची तयारी दर्शवली आहे.

हे बॉम्बस्फोट कोच्छिकाडे, निगोम्बो या २ ठिकाणची सेंट अँटोनी’ज चर्च, काटुवापिटिया येथील सेंट सेबॅस्टिन्स चर्च आणि बट्टीकलोआ येथील झियोन चर्च येथे झाले. तसेच, कोलंबोमधील किंग्सबरी, शांग्री-ला आणि सिनॅमॉन ग्रँड या हॉटेलांमध्येही बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास झाले. बचावकार्यास सुरुवात झाली आहे. जखमींना कोलम्बो राष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटांनंतर श्रीलंकेच्या संरक्षण मंत्र्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली होती.

काही हेल्पलाईन क्रमांक भारतीय नागरिकांसाठी कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केले आहेत. हे क्रमांक पुढीलप्रमाणे – +९४७७७९०३०८२, +९४११२४२२७८८, +९४११२४२२७८९, +९४७७७९०२०८२, +९४७७२२३४१७६

Leave a Comment