अमेरिकेत गोवराची साथ, स्वास्थ्य आणीबाणी जाहीर

newyork
अमेरिकेत गोवराची साथ आली असून त्यामुळे कार्यालये, ऑफिस मधील कर्मचारी वर्ग धास्तावला आहे. सिलिकॉन व्हॅलीत गुगल मुख्यालयात एका कर्मचार्याला गोवर झ्लायाची बातमी उशिरा जाहीर झाल्याने गुगल कार्यालयात तसेच आसपासच्या अन्य कार्यालयातील कर्मचारी घाबरले आहेत. तर न्युयोर्क शहरात हेल्थ इमर्जन्सी लागू केली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २००० साली अमेरिका गोवरमुक्त झाल्याचे जाहीर केले गेले होते. त्यामुळे गोवारासाठी केले जाणारे लसीकरण थंडावले होते. त्यातच लसीकरणामुळे ऑटीझम व अन्य आजार होतात अशी भीती लोकांमध्ये होती यामुळे लसीकरण करून घेण्यास फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. यंदाच्या वर्षात ५५५ जणांना गोवराची बाधा झाल्याचे दिसून आले आहे.

measels
सिलिकॉन व्हॅलीतील गुगल कार्यालयात ४ एप्रिल रोजी गोवर झालेला कर्मचारी आला होता. त्याची ताबडतोब तपासणी केली गेली मात्र त्याला गोवर झाला आहे हे जाहीर करेपर्यंत १३ एप्रिल तारीख उजाडली होती. परिणामी या कर्मचार्याच्या संपर्कात आलेले लोक घाबरले. डॉक्टरनी परिस्थिती नियंत्रणात आहे असे जाहीर करूनही लोकांमधील भीती कायम आहे. लसीकरण करून घेण्यास लोक उत्सुक नाहीत. सुरक्षेचा उपाय म्हणून युट्यूब आणि सोशल मिडियावरील लसीकरण विरोधातील मजकूर हटविला गेला असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment