दुर्मिळ काकापो पोपटांंनी केला ब्रीडिंगचा विक्रम

parrot
जगातील सर्वात मोठा आणि दुर्मिळ पोपट काकापोने ब्रीडिंग म्हणजे अंडी घालण्याचे यंदा रेकॉर्ड केले असून न्यूझीलंडच्या वैज्ञानिक डॉ. दिग्बो त्यांनी या खास जातीच्या पोपटांनी यंदा विक्रमी २४९ अंडी घातल्याचे आणि त्यातून आत्तापर्यंत ८९ पिले बाहेर आली असल्याचे जाहीर केले आहे. येथे काकापो पोपटाना वाचविण्यासाठी खास प्रयत्न केले जात आहेत. रात्री पाहू शकणारे हे पोपट दुर्मिळ झाले असून वेगाने ते नामशेष होत आहेत. येत्या ५० वर्षात ते पूर्ण नामशेष होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

kakapo
हा नर पोपट सरासरी ४ किलो वजनाचा असतो. विशेष म्हणजे जलवायू परिवर्तन आणि गोलाब्ल वॉर्मिंग या पक्षांची संख्या वाढण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. कारण त्यामुळे त्यांच्या ब्रीडिंग सिझनमध्ये मेटींग अधिक प्रमाणात झाले. रिमू झाडावर जी फळे येतात ती डी व्हिटॅमीनने परिपूर्ण असतात आणि या व्हिटॅमीनचा प्रजनन आणि आरोग्याशी थेट संबंध असतो. यंदा रिमू झाडांना तापमान बदलामुळे भरपूर फळे आली आहेत त्यामुळे पोपटांची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे.

kakapo11
१९७० मध्ये काकापोची संख्या १४७ होती. हिरव्या पिवळ्या आणि काळ्या रंगाचा हा पोपट. यात ब्रीडिंगवर मादी पोपटाचे नियंत्रण असते आणि दोन किंवा चार वर्षांनी एकदा हे ब्रीडिंग होते. यात मादी पोपटच तिचा साथीदार निवडते. मेटींग नंतर नर पोपटाला अंड्यातून पिले बाहेर येईपर्यंत घरट्याबाहेर काढले जाते. न्यूझीलंड मध्ये काकापो संख्या वाढावी यासाठी लक्षपूर्वक मोहीम चालविली जात असून प्रत्येक पोपटाच्या शरीरात रेडीओ ट्रान्समीटर बसविले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवता येते. सध्या यात ५० मादी पोपट आहेत आणि त्यांनी २४९ अंडी दिली आहेत. त्यातून ८९ पोपट जन्माला आले आहेत.

Leave a Comment