साध्वी प्रज्ञांनी मारली आपल्या वक्तव्यावरुन पलटी

sadhavi
भोपाळ – हेमंत करकरेंवर केलेले वादग्रस्त वक्तव्य भाजपने हात झटकल्यावर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मागे घेतले आहे. देशाच्या शत्रूंना (विरोधी पक्षांना) आपण केलेल्या वक्तव्यांचा फायदा होत असल्यामुळे आपण केलेले वक्तव्य मागे घेऊन माफी मागत असून ते आपले वैयक्तिक मत होते, असे स्पष्टीकरण ठाकूर यांनी दिले.

हेमंत करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझे सुतक संपवले, असे म्हणत साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुंबईचे एटीएस प्रमुख दिवंगत शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. साध्वी मैने कहा था तेरा सर्वनाश होगा, असेही म्हणाल्या होत्या. माझ्यावर हेमंत करकरे यांनी केलेली कारवाई ही देशद्रोही आणि धर्मविरोधी होती. तसेच त्यांनी माझ्याबाबत चुकीचा व्यवहार केला असल्याचेही साध्वी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटले आणि त्यांच्यावर टीका होत होती.

भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह या भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्या भोपाळमधून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यांनी बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांना अटकही झाली होती.

भाजपने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.ठाकूर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मालेगाव प्रकरणातील पीडितांकडून त्यांचा विरोध करण्यात येत आहे. तर, त्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.

Leave a Comment