स्पाईसजेटने जेट एअरवेजच्या 100 वैमानिकांसह शेकडो कर्मचाऱ्यांना दिली नोकरी

spicejet
मुंबई : जेट एअरवेजची सेवा बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आल्यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. पण स्पाईसजेट आता जेटच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. स्पाईसजेटने जेट एअरवेजच्या 100 वैमानिकांसह 500 कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे. जेटच्या कर्मचाऱ्यांना भविष्यात देखील नोकरी देण्याची तयारी असल्याचे स्पाईसजेटकडून सांगण्यात आले आहे.

येणाऱ्या काळात स्पाईसजेट कंपनी अधिक विमाने आणि नव्या मार्गांवर सेवा सुरु करणार आहे. २७ नवी विमाने येणार असल्याचे या कंपनीने सांगितले आहे. सेवा बंद झाल्यानंतर जेट एअरवेजने प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सेवांची संख्या कमी झाली आहे. स्पाईसजेट ही क्षमता भरून काढण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे.

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना स्पाईसजेटच्या भरतीमध्ये प्राथमिकता दिली जात असल्याचे स्पाईसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले. जेट एअरवेजची सेवा बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आल्यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. जेट एअरवेज कर्मचाऱ्यांनी यामुळे जेट एअरवेजच्या ऑफिसबाहेर आंदोलन देखील केले होते. जेट एअरवेजची सेवा 17 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो कर्मचारी रस्त्यावर आले आहेत.

Leave a Comment