साध्वीच्या शापाने हाफिज सईद, मसूद अझहर, दाउद इब्राहिम मरतील का ?

rahul-dohlkia
साध्वी प्रज्ञा यांनी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यावर बॉलिवूड दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात दंगलीवर आधारित ‘परजानिया’ हा चित्रपट राहुल ढोलकिया यांनी बनवला होता. त्यांच्या नावावर शाहरुख खानच्या ‘रईस’सह अनेक चित्रपट आहेत. ढेलकिया यांनी साध्वी प्रज्ञा यांना दहशतवाद्यांना शाप देऊन त्यांचा संहार करण्याचे आवाहन केले आहे.

राहुल ढोलकिया साध्वी प्रज्ञांबद्दल प्रतिक्रिया देताना लिहितात, साध्वी प्रज्ञा शाप देऊन हाफिज सईद, मसूद अझहर, दाउद इब्राहिम यांनाही मारु शकतात का? हेमंत करकरे यांचा सर्वनाश होईल, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांना मुंबईत २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले होते. ते मालेगाव येथे झालेल्या दहशतवादी स्फोटाचे तपास करत होते. साध्वी प्रज्ञांवर हा स्फोट घडवून आणल्याचा आरोप होता. साध्वी सध्या जामिनावर बाहेर असून त्या भोपाळ लोकसभा निवडणूकीसाठी भाजपच्या उमेदवार आहेत. भोपाळमध्ये काँग्रेसचे उमेद्वार माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात साध्वी प्रज्ञा लढत आहेत. यापूर्वीही साध्वी प्रज्ञा यांनी दिग्विज यांच्या विरोधात काही वादग्रस्त विधाने केली आहेत.

Leave a Comment