टिक टॉक लाँच करणार नवे अॅप

tiktok
मुंबई : टिक टॉक अॅपवर भारतात बंदी आणली असली तरी भारतात आता टिक टॉक कंपनी 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. चीनमधील बाईट डान्स ही एक स्टार्टअप कंपनी आहे. टिक टॉक याच कंपनीचे अॅप आहे. कंपनीने याआधी भारतात काही अॅपसाठी 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. विगो, हेलो आणि टिक टॉकचा या अॅपचा यामध्ये समावेश आहे. भारतात पुढच्या महिन्यात बाईट डान्स एक नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कंपनी कॉन्टेन्ट मॉडरेशन पॉलिसीला मजबूत करत आहे. टिक टॉकवर भारतात बंदी केल्यामुळे वाईट वाटले, पण मला अपेक्षा आहे यावर आम्ही काही तरी मार्ग शोधू. आमचा भारतीय यूजर्सला शब्द आहे, कंपनीकडून येणाऱ्या तीन वर्षात एक वेगळे अॅप लाँच करु, असे बाईट डान्सचे आंतरराष्ट्रीय पब्लिक पॉलिसी डायरेक्टर म्हणाले.

लवकरच भारतात बाईट डान्स एक व्हिडीओ शेअरिंग अॅप लाँच करणार आहे. एकूण 20 अॅप्स या कंपनीचे आहेत. यामध्ये तीन अॅप हे भारतात आहेत. नवीन लाँच होणारे अॅप टिक टॉकसारखा असेल की इतर वेगळ्या प्लॅटफॉर्मवर असेल याबद्दल कंपनीने अजून स्पष्ट केलं नाही. तसेच यावर्षाच्या अखेरीस कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढही करणार आहे.

भारतात टिक टॉक अॅपचे एकूण 130 कोटी यूजर्स आहेत. या अॅपने खूप कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली. आज मोठ्या प्रमाणात हा अॅप भारतीय वापरत आहेत. पण काही आक्षेपार्ह व्हिडीओ या अॅपच्या माध्यमातून व्हायरल होत असल्याने मद्रास हायकोर्टाकडून या अॅपवर बंदी घालण्यात आली. हायकोर्टाच्या आदेशानंतर कंपनीने गुगल प्ले स्टोअरमधूनही अॅप हटवला. यामुळे नवीन युजर्स हा अॅप डाऊनलोड करु शकत नाही. मात्र ज्या यूजर्सकडे हा अॅप आहे ते याचा वापर करु शकतात.

Leave a Comment