मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे उदयनराजेंनी शुध्दीत द्यावीत – नरेंद्र पाटील

narendra-patil
सातारा : सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे उदयनराजेंनी शुध्दीत द्यावी, असा टोला लगावला. नरेंद्र पाटील यांनी यावेळी सातारा जिल्ह्याचा कुठलाही विकास उदयनराजेंनी केला नसल्याचीही टीका केली. पाटील यांनी यावेळी उदयनराजेंनी प्रचारासाठी घेतलेल्या हॉटेल मालकाने नगरपालिकेचा 53 लाखाचा कर भरला नसल्याची कागदपत्रे सादर केली.

निवडणूक आयोगावर यावेळी त्यांनी संशय व्यक्त करुन निवडणूक आयोगाने त्यांची कागदपत्रे चेक केली नाहीत का? असा आरोप त्यांनी केला. ते यावेळी म्हणाले की, 2017 मध्ये आनेवाडी टोल नाक्याच्या कारणातून झालेल्या सुरुची राड्यातील सुमारे दीडशेच्यावर कार्यकर्त्यांना पोलिसांनी हद्दपारीच्या नोटीसा काढल्या आहेत. पण उदनयराजेंना यात हद्दपारीची नोटीस पोलिसांनी का नाही काढली, असे पाटील म्हणाले.

जिल्हा पोलीस प्रमुखांना यासाठी भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या लोकांकडून मतदारांना त्रास देण्याचे काम होऊ शकते. मतदान प्रक्रियेपासून त्यामुळे यांना अलिप्त ठेवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी सातारा जिल्ह्यात निधीबाबत आकड्यांच्या बदलावरून पुन्हा टीकास्त्र सोडले. कुठून आणि कुठला निधी विद्यमान खासदारांनी आणला हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे.

Leave a Comment