या शहरात राहा, सरकार कडून पैसे मिळवा

detroit
जगात कुठेही राहायला गेले तरी आपला खर्च चालविण्यासाठी पैसे लागतातच. मग त्यासाठी कुणी नोकरी करेल, कुणी व्यवसाय करेल कुणी आणखी काही काम करेल. आपल्याला ज्या प्रमाणात कमाई होणार त्यानुसार आपले राहणीमान ठरत असते. पण जगात आता काही देशात अशी शहरे आहेत कि तेथे तुम्ही राहायला यावे म्हणून तेथील सरकारे तुम्हाला पैसे देत आहेत. शिवाय घर, अन्य सुविधाही दिल्या जात आहेत.

अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील मोटर नगरी अशी ओळख असलेले आणि काही दशकांपूर्वी अमेरिकेतील दाट लोकवस्तीचे तसेच सर्वाधिक दरडोई उत्पादन असलेले डेट्रोइट अश्या शहरांच्या यादीत आहे. या शहराने काही वर्षांपूर्वी दिवाळखोरी जाहीर केली असून येथील लोकसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यमुळे येथे येऊन राहू इच्छिणाऱ्या लोकांना सरकार २० हजार डॉलर्स देणार आहे. यातून तुम्ही तुमचा कोणताही व्यवसाय सुरु करू शकाल त्यासाठी गरज पडल्यास आणखी मदत सरकार करणार आहे. १९५० पासुन या शहरातून मोठ्या संख्येने लोकांनी स्थलांतर केले आहे आणि अजूनही ते सुरूच आहे.

saskechevan
सास्केचेवान हे कॅनडातील शहर असेच येथे वास्तव्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या लोकांना पायघड्या घालून प्रतीक्षेत आहे. फिनलंड जवळ असलेल्या या ठिकाणी खनिजे मोठ्या प्रमाणात आहेत आणि शेती खूप आहे. येथे कॉलेज सारख्या अन्य सुविधाही आहेत मात्र लोकसंख्या कमी आहे. वास्तविक हे ठिकाण निसर्गसुंदर आहे. येथल्यासारखी सँडड्यून अन्यात्र दिसणार नाहीत. दिवसा निळेभोर आकाश आणि सायंकाळी त्यात उमटणारे पिवळे जांभळे रंग कुणालाही भुरळ पडतील. येथेही तुम्ही तुमचा कोणतीही व्यवसाय सुरु करू शकता सरकार तुम्हाला मदत करेल.

ponga
स्पेनमधील पोंगा हे असेच आणखी एक गाव. या गावात जुनी घरे विक्रीसाठी आहेत पण गावातील लोक कामाच्या शोधात अन्यत्र गेल्याने या गावात आता अगदीच कमी लोक राहत आहेत. येथे येऊन राहणाऱ्या जोडप्याना स्पेन सरकार आर्थिक मदत देणार आहे.

naigra
नायगारा फॉल सिटी हे जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथे तरुण प्रोफेशनल अधिक संख्येने राहायला यावेत यासाठी सरकार पदवीचे शिक्षण घेत असलेल्याना ७०० डॉलर्स मदत देत आहेच पण त्यासाठी दोन वर्षे राहिले पाहिजे अशी अट आहे. या काळात हे तरुण येथे स्थानिक खासगी अथवा सरकारी व्यवसायात काम करून आणखी पैसे मिळवू शकणार आहेत.

Leave a Comment