हॉट दिशा पटनीची फौजी बहिण खुशबू नेटवर व्हायरल

khusbu
बॉलीवूड मध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवीत असलेली अभिनेत्री दिशा पटनी जवळजवळ रोज तिचे फोटो शेअर करत असते आणि त्यामुळे सोशल मिडीयावर ती नेहमीच चर्चेत असते. मात्र तिने नुकताच तिची बहिण खुशबू हिच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे आणि त्यामुळे दिशा पेक्षा तिची ही बहिणच प्रसिद्धीत आली आहे. दिशा सारखीच सुंदर आणि नाजूक दिसणारी खुशबू भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर कार्यरत असून तिचा लष्करी गणवेशातील फोटो दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि इंटरनेटवर तो वेगाने व्हायरल होतो आहे.

disha
वास्तविक दिशाने खुशबूसह तिचे काही फोटो पूर्वीही सोशल मिडीयावर शेअर केले आहेत पण लष्करी गणवेशातील तिचा फोटो प्रथमच पाहायला मिळाला आहे. दिशाने अनेकदा मुलाखती देताना तिची बहिण खुशबू हीच तिची जीवनप्रेरणा असल्याचे सांगितले आहे. दिशा म्हणते, ती नुसती बहिण नाही तर माझी चांगली मैत्रीण आहे. ती चांगली डान्सर आहे, चांगली वक्ती आहे आणि कॉलेज टॉपर ही आहे. ती बास्केट बॉल उत्तम खेळते आणि शाळेत असताना दिशा खूपच शाय होती तेव्हा सतत खुशबू तिच्यासोबत असे.

दिशाचे वडील जगदीश पोलीस विभागात सीओ पदावर आहेत. दिशाच सलमान खान सोबतचा भारत चित्रपट ५ जून रोजी रिलीज होत आहे आणि त्यानंतर ती मोहित सुरीच्या बागी ३ आणि मलंग या चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Comment