मोटो झेड फोरची स्पेसिफिकेशन लिक

motoz4
मोटोच्या नव्या झेड ४ स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन ऑनलाईन वर लिक झाली असून हा फोन याच वर्षात लाँच केला जाणार आहे. या वर्षात ४८ एमपी कॅमेरा असलेले अनेक फोन विविध कंपन्यांनी सादर केले आहेत त्याच मिडरेंज फोन मध्ये मोटोचा नवा झेड फोर असेल असे सांगितले जात आहे.

लिक झालेल्या माहितीनुसार या फोनला ६.४ इंची ओलेड डिस्प्ले वॉटरड्रोप नॉच सह असेल आणि त्यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. हा फोन नेक्स्ट जेन ५ जी नेटवर्क मोड्यूल सपोर्ट करेल आणि तो ४ आणि ६ जीबी रॅम अश्या दोन व्हेरीयंट मध्ये मिळेल. या फोनला रिअर मध्ये ४८ एमपीचा कॅमेरा असेल शिवाय १२ प्लस ६ एमपीचे दोन कॅमेरे दिले जातील. त्यातील एक नाईट व्हिजन सह असेल. सेल्फीसाठी २५ एमपीचा कॅमेरा दिला जाईल आणि हा फोन अँड्राईड ९.० ओएसवर रन करेल.

विविध कंपन्यांची सध्या जी फ्लॅगशिप मॉडेल बाजारात ज्या किमतीत उपलब्ध आहेत त्याच्या निम्म्या किमतीत मोटो झेड ४ उपलब्ध केला जाईल असेही सांगितले जात आहे. गतवर्षी मोटो झेड ३ अमेरिकेत ४८० डॉलर्स म्हणजे ३३,३०० रुपयात विकला जात होता.

Leave a Comment