इंस्टाग्रामवर पदार्पण करताच हिट झाला प्रभास

prabhas
दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह जगभरात ‘बाहुबली’ फेम प्रभास लोकप्रिय आहे. प्रभासला ‘बाहुबली’च्या दोन्हीही भागांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. आत्तापर्यंत फेसबुकच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात होता. नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे. त्याच्या इंस्टाग्रामवरील पहिल्याच फोटोला चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत.


१६ एप्रिलला प्रभासने इन्स्टाग्रामवर पदार्पण केले होते. त्याने पहिल्यादिवशी कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. तरी देखील त्याच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंवर होती. त्याने अलिकडेच तलवारीचे प्रशिक्षण घेतानाचा एक फोटो शेअर केला होता. सध्या सोशल मीडियावर या फोटोची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

तो त्याच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे. या चित्रपटात तो अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. श्रद्धा कपूरही या चित्रपटात त्याच्यासोबत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला ‘साहो’चा टीजर आला. टीजरलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ या भाषेत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

Leave a Comment