आमचे सूतक मोदी अन् अमित शहाची टोळी निवडणूक हरेल तेव्हाच संपेल

amey-khopkar
मुंबई – मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत भाजपच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आता ठिकठिकाणी याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्याच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. दरम्यान मनसेनेही साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करुन, मोदी आणि अमित शहाची टोळी निवडणूक हारेल, तेव्हाच आमचे सूतक संपेल, असे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.

मला हेमंत करकरेंनी चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, स्वत:च्या कर्मानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे. आपल्या मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन मनसेने अमेय खोपकर यांची पोस्ट शेअर केली आहे. अमेय खोपकर यांनी त्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.


मुक्ताफळ म्हणावे की गटारगंगा ? स्वत:ला कधी साध्वी म्हणवणाऱ्या भोपाळच्या उमेदवारामुळे. आमच्या करकरेसाहेबांविषयी नको ते बरळून या कथित साध्वीने भाजपची देशभक्ती कशी असते हे दाखवून दिले आहे. याचा नुसता निषेध करुन भागणार नाही, जेव्हा मोदी-शहांची टोळी निवडणूक हरेल तेव्हाच आमचे सूतक संपेल, अशी तीव्र प्रतिक्रिया मनसेच्या खोपकर यांनी दिली आहे.

Leave a Comment