हेमंत करकरेंना ठार करुन दहशतवाद्यांनी माझे सुतक संपवले – साध्वी प्रज्ञा

sadhavi-pragya
भोपाळ : भाजपने भोपाळमधून दिग्विजय सिंह यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी मिळताच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. खोट्या खटल्यात मला फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझे सूतक संपवले, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञाने केले आहे. साध्वी प्रज्ञाच्या या जाहीर वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

मला चुकीच्या पद्धतीने हेमंत करकरेंनी खटल्यात अडकवल्यामुळे त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळाले, असे साध्वी म्हणाली. एका सभेत साध्वी म्हणाली, सुरक्षा समितीचा तपास अधिकारी सदस्य होता. हेमंत करकरेंना बोलवून त्याने मला सोडण्यास सांगितले होते. पण त्याला नकार देत, मी काहीही करुन पुरावे आणेन, पण साध्वीला सोडणार नाही असे हेमंत करकरेंनी म्हटले होते. ही हेमंत करकरेंची कूटनिती होती, देशद्रोह होता, धर्मविरोध होता. मला ते विचारत होते मला सत्यासाठी देवाकडे जावे लागेल का, मी तेव्हा त्यांना म्हणाले तुम्हाला वाटत असेल तर जा, असे साध्वीने सांगितले.

मी त्यावेळी तुझा सर्वनाश होईल, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी मला शिव्या दिल्या होत्या. मी ज्यावेळी जेलमध्ये गेले तेव्हापासून सूतक लागले होते, पण त्यांना दहशतवाद्यांना मारले तेव्हा माझे सूतक संपले, असे संतापजनक वक्तव्य साध्वी प्रज्ञाने केले. शहीद हेमंत करकरेंची तुलना साध्वी प्रज्ञाने कंसाशी केली. जसा श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, तसेच देवाने त्यांचा वध केल्याचे साध्वी म्हणाली. भगवान राम काळात रावण झाला, त्याचा अंत संन्यासांद्वारे झाला. द्वापारयुगात कंस झाला तेव्हा त्याचा अंत करण्यासाठी श्रीकृष्ण आला, असे साध्वी बरळली.

Leave a Comment