नवी दिल्ली – दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलच्या १२ व्या मौसमातील ३४ वा सामना खेळला गेला. रोहित शर्माने या सामन्यात नवा विक्रम केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावा रोहितने पूर्ण केल्या आहेत. सामन्यापूर्वी ८ हजार धावा करण्यासाठी त्याला १२ धावांची गरज होती. कालच्या सामन्यात त्याने ३० धावा करत हा विक्रम केला.
टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा तिसरा भारतीय खेळाडू
अशी कामगिरी करणारा रोहित तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. चेन्नईचा सुरैश रैना आणि बंगळुरूचा विराट कोहली यांनी यापूर्वी हा पराक्रम केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये रैनाने ३११ सामन्यात ८ हजार २१६ धावा केल्या. त्यात ४ शतके आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. २६० सामन्यात कोहलीने ४०.९१ च्या सरासरीने ८ हजार १८३ धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर ४ शतके आणि ६० अर्धशतकांची नोंद आहे. रोहितच्या नावावर आता ६ शतके आणि ५३ अर्धशतकांसह ८ हजार १८ धावा केल्या आहेत.
ख्रिस गेल टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. ३७९ सामन्यात त्याने १२ हजार ६७० धावा जमवल्या आहेत. टी-२० मध्ये पहिल्यांदा १० हजार धावांचा पल्ला गाठण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.