या गुहेत जन्मले होते महाबली हनुमान

anjan
आज देशभरात बजरंगबली हनुमान यांचा जन्मदिवस साजरा होत आहे. भारतात एकही गाव असे नाही जेथे हनुमान मंदिर नाही. चैत्री पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. हनुमान हा शंकराचा ११ वा अवतार मनाला जातो. मात्र त्यांच्या जन्माविषयी खूपच कमी ग्रंथातून माहिती मिळते. वाल्मिकी रामायण कथेनुसार सध्याच्या झारखंड राज्यातील आंजनधाम येथे हनुमान एका गुहेत जन्माला आले होते.

असेही सांगतात ज्या गुहेत हनुमान जन्माला आले, त्या गुहेचा दरवाजा कलियुगात आपोआप बंद झाला. या गुहेसमोर स्थानिक लोकांनी बळी चढविला होता व त्यामुळे अंजनीमातेने स्वतः या गुहेचा दरवाजा बंद केला होता अशी कथा सांगतात. गुमला जिल्यात हे गाव असून त्याचे नाव अंजनीवरूनच पडले आहे. या गुहेजवळ हनुमानाचे एकमेव असे मंदिर आहे ज्यात हनुमान अंजनी मातेच्या मांडीवर बालरूपात आहेत. बजरंगबलीच्या भक्तांनी हे छोटे मंदिर १९५३ मध्ये बांधले आहे. येथील मूर्ती अतिशय सुंदर आहे.

mata
हनुमान जन्माची कथा अशी सांगतात, अमरत्वप्राप्तीसाठी देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून अमृतकुंभ मिळविला पण दानवांनी तो पळविला. त्यामुळे देव दानव यांच्यात युद्ध सुरु झाले. दानव देवांना वरचढ ठरू लागले तेव्हा विष्णूने मोहिनी रूप घेतले. विष्णूच्या मोहिनी रूपावर केवळ देव दानवच नाही तर खुद्द महादेव सुद्धा भुलले. तेव्हा कामातुर झालेल्या शिवाने विर्याचा त्याग केला ते वीर्य पवन देवाने वानरराज केसरी याची पत्नी अंजनीच्या गर्भात प्रविष्ट केले आणि त्यातून हनुमानाचा अवतार झाला.

Leave a Comment