आर्मी श्वानाना निवृत्तीनंतर घातली जाते गोळी

army
कुत्र्यांची जमात अतिशय प्रामाणिक आणि वफादार, विश्वासू मानली जाते. एकवेळ माणूस धोका देईल पण कुत्रा कधीही मालकाला धोका देत नाही असे म्हणतात. त्यामुळे वफादारी शिकावी तर कुत्र्याकडून असे म्हटले जाते. कुत्रा नुसता विश्वासू नसतो तर अतिशय हुशार आणि खूप कामे शकणारा आणि ती पार पडणारा असतो. यामुळे जगातील बहुतेक देशातील पोलीस तसेच लष्करात श्वान पथके असतात आणि त्यांचा उपयोग अनेक महत्वाच्या मोहिमातून करून घेतला जातो.
लष्कराला श्वान फार उपयोगी प्राणी आहे. या कुत्र्यांना लष्करात रँक दिल्या जातात. मात्र ही कुत्री निवृत्त झाली कि यांना गोळ्या घालून ठार केले जाते. यामागे ही कुत्री दुसर्या कुणाला व्यक्ती त्यातही देशद्रोही व्यक्तीकडे जाऊ नयेत असा उद्देश असतो. कारण या कुत्र्यांना आर्मीच्या अनेक गुप्त ठिकाणांची माहिती असते आणि ती शत्रूला समजली तर देशाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. काही कारणाने प्रशिक्षित केलेली कुत्री आजारी पडली तर त्यांच्यावर योग्य उपचार केले जातात पण महिन्याभरात ती बरी झाली नाहीत तर त्यानाही गोळी घालून ठार केले जाते.

लष्करात कुत्री वापरण्याची प्रथा प्राचीन असून इसवीसन ६०० पूर्वीपासून कुत्री युद्धात वापरली जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. इजिप्शियन रोमन ग्रीक कुत्र्यांचा वापर या कारणासाठी करत असत. आजही युएस मिलिटरी मध्ये श्वान पथक महत्वाची भूमिका बजावत आहे. तसेच भारतीय लष्करात सुद्धा श्वान पथक आहेच. ही कुत्री सर्वसाधारण जर्मन शेफर्ड जातीची असतात. तसेच लाब्रेडोर जातीची कुत्रीही त्यासाठी निवडली जातात.

या कुत्रांना एखाद्या सैनिकाप्रमाणे कडक प्रशिक्षण दिले जाते व त्यात जी योग्य ठरतील त्यांची निवड केली जाते. बॉम्बशोधक पथक, पूर, भूकंप अश्या आपत्तीत हरविलेल्या माणसांचा शोध ही कुत्री घेतातच पण वेळ पडेल तेव्हा हल्ला चढविण्याचे कामही करतात. सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन मध्ये कुत्री अतिशय सहाय्यक ठरतात. इंडिअन आर्मी कडे १ हजार अशी प्रशिक्षित कुत्री आहेत.

या कुत्र्यांना प्रशिक्षण देताना युद्ध भूमीत शत्रूला कळू न देता भुंकून कश्या सूचना द्यायच्या याचेही शिक्षण दिले जाते. २०१६ सालच्या भारताच्या प्रजासत्ताक परेड मध्ये श्वान पथक प्रथमच सामील केले गेले होते. लष्करात साधरणपणे ८ ते १० वर्षे ही कुत्री सेवा देऊ शकतात.

Leave a Comment