असे होते जेटचे शेवटचे उड्डाण

connect
भारतात गेली २६ वर्षे हवाई वाहतूक क्षेत्रात असलेल्या जेट एअरवेजने बुधवारी रात्री शेवटचे उड्डाण केले असून या बरोबरच कंपनीचा प्रवास आता संपुष्टात आला आहे. कर्जात बुडाल्याने ही कंपनी अखेर बंद करावी लागली. बुधवारी जेटच्या जी डब्ल्यू ३५०२ या फ्लाईटने रात्री १०.२० वाजता अमृतसरपासून अखेरचे उड्डाण केले आणि ती मुंबईला पोहचली.

विशेष म्हणजे या फ्लाईटमधील काही जणांना हे जेटचे शेवटचे उड्डाण आहे याची कल्पना नव्हती इतकेच नव्हे तर विमानातील हवाईसुंदरीनाही उड्डाण होण्यापूर्वी थोडावेळ अगोदर हे उड्डाण शेवटचे असल्याचे समजले होते. विमानाच्या क्रू कॅप्टनने मात्र सूर्य पुन्हा उगवेल अशी आशा व्यक्त केली. २६ वर्षे या क्षेत्रात असलेल्या जेटला ८ हजार कोटींचे कर्ज झाले असून बँकांनी ४०० कोटींचा इमर्जन्सी फंड देण्यास नकार दिल्याने कंपनीचे शटडाऊन करण्याशिवाय अन्य पर्याय उरला नव्हता.

jetair
फ्लाईटमधील प्रवाशांना जेव्हा हे शेवटचे उड्डाण असल्याचे कळले तेव्हा त्यांनी खेद व्यक्त केला. काही प्रवाशांनी जेटची सुविधा नेहमीच सरस होती असे सांगितले तर एका उद्योजकाने चांगली चालत असलेली कंपनी अचानक बुडते याचे काय दु:ख असते याची कल्पना असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या विमानात असेही काही प्रवासी होते ज्यांनी त्याचा पहिला विमानप्रवास जेट एअरवेज मधून केला होता. अनेकांनी ही बातमी चांगली नाही अशी प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment