ओटीआर ग्लोबलने नुकत्याच सादर केलेल्या एका रिपोर्टनुसार पुढील वर्षाच्या मार्चमध्ये अॅपल छोट्या स्क्रीनचे आयफोन बाजारात उतरविण्याची शक्यता आहे. या मागे आयफोनच्या विक्रीत होत असलेली घसरण आणि त्यामुळे पर्यायाने कंपनीचा घटलेला महसूल हे कारण आहे. अहवालानुसार गतवर्षात अॅपलने आयफोन एक्स एस व एक्स आरचे जगभरात ३७ ते ४२ दशलक्ष फोन विलाले असून ही घट २४ टक्के इतकी आहे. याच काळात त्यापूर्वीच्या तिमाहीत ४० ते ४५ दशलक्ष फोन विकले गेले होते.
विक्री घटली, अॅपल आणणार छोट्या स्क्रीनचे आयफोन
अॅपल आयफोनच्या विक्रीत दरवर्षाला २१ ते २४ टक्के घट नोंदविली जात असून कंपनीचा महसूल १५ टक्के घटला आहे. याचा गंभीर विचार कंपनी करत आहे आणि त्यामुळे कमी किमतीत छोट्या स्क्रीनचे आयफोन बाजारात आणण्याचा विचार केला जात आहे. हे नवे आयफोन ४.७ इंची स्क्रीन सह असतील असे समजते. या फोनचे डिझाईन आयफोन ८ प्रमाणे असेल आणि त्याला ए १२ बायोनिक चीप दिली जाईल. एलसीडी डिस्प्ले, सिंगल रिअर कॅमेरा, १२८ जीबी स्टोरेज अशी त्याची अन्य फीचर्स असतील. अॅपल या कॅटेगरीतील चार नवी मॉडेल्स सादर करेल असा अंदाज असून या फोनची २० दशलक्ष युनिट्स बनवेल असेही सांगितले जात आहे.