जगात प्रथमच वृद्धांची संख्या बालकांपेक्षा अधिक

old
संयुक्त राष्ट्रसंघाने नुकात्याच जाहीर केलेल्या एका अहवालानुसार जगाच्या इतिहासत प्रथमच वृद्ध लोकांची संख्या बालकांपेक्षा अधिक झाली आहे. २०१८ अखेरी ६५ वर्षांवरील नागरीकांची संख्या ० ते ४ वयोगटातील बालकांपेक्षा अधिक भरली आहे. वृद्धांची संख्या ७०.५ कोटी तर ५ वर्षाखालील मुलांची संख्या ६८ कोटी भरली आहे. २०५० पर्यंत जगात ० ते ४ वयोगटातील जितकी बालके असतील त्याच्या दुप्पट संख्या ६५ वर्षांवरी वृद्धांची असेल असाही अंदाज वर्तविला जात आहे.

लोकसंख्या तज्ञ गेली काही दशके लोकसंख्येच्या या स्वरूपावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्या मते आज जीवनमान दीर्घ झाले आहे, लोक दीर्घकाल जगत आहेत मात्र जन्मदर घटला आहे त्यामुळे कमी मुले जन्माला येत आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील हेल्थ मेट्रिक्स व इव्हॅल्युएशन विभागाचे संचालक क्रिस्टोफर मरे म्हणाले जगात आज हा जो ट्रेंड आहे त्यामुळे वैश्विक समाज अडचणीत येणार आहे. जगातील निम्म्या देशात लोकसंख्येचे सध्याचे स्वरूप कायम राखण्यासाठी पुरेशी लहान मुले नाहीत.

child
आज लहान मुलांपेक्षा आजी आजोबा जास्त आहेत. याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम भोगावे लागणार आहेत. १९६० मध्ये माणसाचे सरासरी आयुष्य ५२ वर्षे होते ते २०१७ मध्ये ७२ वर गेले आहे. १९६० साली एका वृद्धामागे २.४ बालके असे प्रमाण होते ते अजून घटले आहे. जगाची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे तशीच सामाजिक प्रगती होत आहे. याचा फायदा जन्माला येणार्यांना होणार आहे आपण त्याचबरोबर वृद्धाना द्यावी लागणारी पेन्शन, स्वास्थ सेवा यावरचा खर्च वाढतो आहे.

माणूस जादा जगला कि त्याला जादा संसाधने लागतात. विकसित देशात वृद्ध जादा जगतात आणि बालमृत्यू दर कमी आहे तसाच तेथील जन्मदर कमी झाला आहे. मुलांना सांभाळणे खर्चिक होत आहे. त्यामुळे मुले जन्माला न घालण्यास तरुण प्राधान्य देत आहेत. जपान हे याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे सरासरी आयुष्यमान ८४ वर्षांवर गेले असून जन्मदर कमालीचा घटला आहे. परिणामी वृद्धांचे लोकसंख्येतील प्रमाण २७ टक्के तर बालकांचे ३.८५ टक्के आहे.

विकसनशील देशांची वेगळीच अडचण आहे. मुले जन्माला येण्याचे प्रमाण जादा आहे पण बालमृत्यूदर अधिक आहे. नायजेरियात जन्मदर जास्त आहे पण तेथे बालमृत्यूदर ही अधिक आहे. लोकसंख्येच्या योग्य प्रमाणासाठी २.१ हा जादुई आकडा मानला जातो. हा प्रजनन दर असेल तर लोकसंख्या स्थिर राहते कारण यात जेवढे वृद्ध मृत्यू पावतात तेवढीच मुले जन्माला येत असतात.

Leave a Comment