मोदींचे हेलिकॉप्टर तपासण्याचे आदेश दिले म्हणून निवडणूक अधिकाऱ्याचे निलंबन

narendra-modi
नवी दिल्ली – संबळपूर येथे एका अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने निलंबित केले. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेलिकॉप्टर तपासण्याचे आदेश या अधिकाऱ्याने दिले होते. प्रचार सभेसाठी पंतप्रधान मोदी संबळला आल्यानंतर त्यांचे हेलिकॉप्टर तपासण्यात आले.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका व्यक्तीचे पथक निवडणूक आयोगाने ओडिशाला पाठविले होते. मोहम्मद मोहसिन या कर्नाटक कॅडरच्या आयएएस अधिकाऱ्याची विशेष निरीक्षक म्हणून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली होती. योग्य प्रकारे निवडणूक आयोगाच्या सूचनांचे त्याने पालन केले नाही. पंतप्रधानांसारख्या विशेष संरक्षण दलाकडून संरक्षण देण्यात आलेल्या व्यक्तीबाबत ही अपवादात्मक कारवाई करण्यात आली.

पंतप्रधान मोदींकडून या कारवाईविषयी तक्रार करण्यात आल्यानंतर या निवडणूक अधिकाऱ्याविरोधात निवडणूक आयोगाद्वारे कारवाई करण्यात आली. २२ मार्चला विशेष संरक्षण दलाकडून संरक्षित करण्यात आलेल्या व्यक्तींवर कारवाई न करण्याच्या तसेच, त्यांना तपासणीतून मुक्तता देण्याविषयी सूचना या अधिकाऱ्याला देण्यात आल्या होत्या, असे आयोगाने म्हटले आहे.

Leave a Comment