लोकांना आपल्या कॉमेडीने वेड लावणारी ‘गंगूबाई’ आता बनली सोशल मीडिया क्वीन

saloni
दरवर्षी अनेक चेहरे छोट्या पडद्यावर येतात. त्यातील काही हिट होतात तर ठराविक काळानंतर काही अचानक गायब होऊन जातात. पण त्यात काही असेही असतात जे कालांतराने एका नव्या अंदाजात पुन्हा एकदा आपल्यासमोर येतात. टीव्हीवरील अशीच एक बालकलाकार जी आता पूर्णपणे वेगळी दिसते. सर्वाच्याच लक्षात टीव्हीवरील छोटीशी पण दमदार गंगूबाई असेल. आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून ज्या मुलीने सर्वांना खळखळून हसवले होते. ती तीन वर्षाची मुलगी फार थोड्या काळातच छोट्या पडद्यावर सुपरस्टार बनली होती.


टीव्हीवरील ही छोटीशी गंगूबाई म्हणजे कॉमेडियन सलोनी डॅनी असून वयाच्या तिसऱ्या वर्षीच सलोनीने टीव्हीवर डेब्यू केला होता आणि ती पदार्पणातच गंगूबाई या नावाने प्रसिद्धही झाली होती. त्यावेळी या तीन वर्षाच्या मुलीने अनेक प्रसिद्ध कॉमेडीयन्सना टक्कर दिली होती.


‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’मधून सलोनीने कॉमेडियन म्हणून डेब्यू केला होता आणि तिला या शोनंतर प्रचंड प्रसिद्धी मिळाली. ती अवघ्या काही काळातच अनेक प्रसिद्ध कॉमेडियनसोबत वेगवेगळे शो करताना दिसली. लोकांना लहानग्या सलोनीच्या या टॅलेंटने आश्चर्य वाटायचे. आता हीच सलोनी 17 वर्षांची झाली आहे. आता ती एवढी स्टायलिश झाली आहे की तिला ओळखणेही प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना कठीण होऊन बसले आहे. लोकांना आपल्या कॉमेडीने वेड लावणारी सलोनी आता सोशल मीडिया क्वीन बनली आहे.

View this post on Instagram

Its not who u dream about, Its who u daydream about 💩

A post shared by Saloni (@salonidaini_) on


‘इक्का-दुक्का’ या मालिकेतही ‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’मधून प्रसिद्धी मिळवणारी सलोनी दिसली. पण तिला या मालिकेत म्हणावी तशी प्रसिद्धी मिळू शकली नाही. तिने ‘बड़े भइया की दुल्हनिया’ ही केलेली शेवटची मालिका, ती त्यानंतर टीव्हीवरून गायब झाली. 2010मध्ये सलोनी ‘नो प्रोब्लेम’ या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती.

Leave a Comment