संजय दत्तची मुलीने शेअर केला आपल्या परदेशी बॉयफ्रेंडचा फोटो

trishala
आपल्यापैकी कित्येकजणांना स्टार किड्सच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रस असतो. अनेकांमध्ये त्यांच्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. सध्या याच कारणामुळे संजय दत्तची मुलगी त्रिशाला चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्रिशाला फार सक्रीय असते. पण ती चर्चेत येण्याचे कारण यावेळी थोडे वेगळे आहे.


त्रिशालाने आपल्या फोटोसोबत जे कॅप्शन लिहिले आहे, यातून सध्या ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे कळते. त्याचबरोबर तिचा बॉयफ्रेंड हा कोणी भारतीय नसून इटलीचा रहिवासी आहे. तिच्या फोटोवर त्रिशालाने कॅप्शन लिहिले की, एका इटालियन व्यक्तीला डेट करायचे म्हणजे भरपूर पास्ता आणि वाइन.

View this post on Instagram

happy holidays 🤪🥃👍🏻🎄@duttsanjay

A post shared by 🧿 Trishala Dutt (@trishaladutt) on


तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर तिच्या या स्टेटसमुळे व्हायरल होत आहेत. आता प्रत्येकालाच जाणून घ्यायची इच्छा आहे की ती नेमकी कोणत्या मुलाला डेट करत आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्माची त्रिशाला मुलगी आहे. न्यूयॉर्कमधून तिने लॉमध्ये शिक्षण घेतले. त्यासोबतच तिला मॉडेलिंग आणि फॅशनचीही आवड आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरचे तिचे फोटो पाहिल्यावर लक्षात येते. इन्स्टाग्रामवर त्रिशाला फार सक्रीय असून सतत ती तिचे फोटो शेअर करत असते. अशा स्टार किड्सपैकी ती एक आहे जी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चर्चेत राहते.

Leave a Comment