न्यूयॉर्क : जगभरातील प्रभावी व्यक्तींमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि लोकचळवळींसाठी कायदेशीर लढा देणाऱ्या अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांचा सहभाग करण्यात आला आहे. जगभरातील प्रभावी व्यक्तींची २०१९ मधील यादी नुकतीच ‘टाइम’ या नियतकालिकाने जाहीर केली आहे. या तिघांचा त्यात समावेश आहे. भारतीय-अमेरिकन कॉमेडियन हरन मिनाज, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही या यादीत समावेश आहे.
जगभरातील प्रभावी व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी, अरुंधती काटजू, मेनका गुरुस्वामींचा समावेश
मुकेश अंबानी यांची व्यावसायिक धोरणे ही अधिक व्यापक असून त्यामुळेच जवळपास २८० दशलक्ष लोकांना कमी किमतीत ४जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे जगभरात व्यापाराचा विस्तार करून त्यांची ‘कर लो दुनिया मुठ्ठीमे’ हे घोषवाक्य खरे केले आहे. तर एलजीबीटीक्यू यांच्यासाठी अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांनी लढा देऊन कायदेशीर मार्गाने त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत.