हा आहे मायावतींचा वारसदार?

aakash-anand
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी 48 तासांसाठी बंदी घातल्यानंतर प्रचाराची जबाबदारी त्यांचा भाचा आकाश आनंद याने सांभाळली. आगऱ्यामधील सभेत आकाशने भाषणही केले. लंडनहून एमबीए करून मायावतींचा हा भाचा आकाश आनंद भारतात परतला आहे. येथे त्याच्या सुटाबुटाची जोरात चर्चा होती. मायावतींनी आकाशला राजकारणात आणणार, असे म्हटले होते. आकाशचे आता अधिकृतरित्या लाँचिंग झाले आहे.
aakash-anand1
मायावतींचा भाऊ आनंद यांचा आकाश हा मुलगा आहे. आपली आत्या मायावतींसोबत आकाश दौरे करून त्यांच्याकडून राजकारण शिकून घेत आहे. याआधी आपला भाऊ आनंद यांना मायावतींनी बसपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केल्यानंतर घराणेशाहीचे आरोप त्यांच्यावर झाले. त्यांनी त्यामुळे आनंद यांना पदावरून काढून टाकले. पण त्यांचा भाचा आकाश हा मात्र गेली २ वर्षं त्यांच्यासोबत दिसतो असल्यामुळेच सोशल मीडियावर मायावतींनी एन्ट्री केल्याचे बोलले जाते.
aakash-anand2
पक्षाचा युवानेता म्हणून आकाशला पुढे आणण्याची मायावतींची इच्छा आहे पण आकाश यांच्याकडे अजून कोणतेही पद देण्यात आलेले नाही. ते सध्या तरी पक्षाचे स्टार प्रचारक आहेत.

Leave a Comment