लवकरच अॅनिमेशन स्वरुपात रोहित शेट्टी यांची लोकप्रिय गोलमाल फ्रँचाईझी पाहायला मिळणार आहे. ती निकलोडियन या लहान मुलांसाठीच्या भारतातील आघाडीच्या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. एक अनोखा शो मॅजिक टून, रुद्रा यानंतर निकलोडियन वाहिनी सादर करणार आहे. गोलमाल ज्युनिअरची भर आगामी कार्यक्रमांमध्ये करून या वाहिनीने पुन्हा एकदा विनोद, धमाल, मनोरंजक व हसवणारे अधिक चांगले, अधिक भव्य कार्यक्रम आणण्याचे आपले वचन पाळले आहे. प्रेक्षकांना गोलमाल सीरिजच्या चित्रपटांनी खळखळून हसवले, मनोरंजन केले आणि गोलमालची ज्युनिअर गँग आता लहान मुलांना हसवण्यास सज्ज झाली आहे.
लहान मुलांना हसवण्यास सज्ज झाली ‘गोलमाल’ची ज्युनिअर गँग
दोन मस्तीखोर गँग्सना गोलमाल ज्युनिअर एकत्र आणणार असून या दोन्ही गँग्स खट्याळ आहेत, उत्साही आहेत पण एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या आहेत. लहानग्यांना गोपाल, माधव, लक्ष्मण आणि लकी यांचे ज्युनिअर अवतार धमाल हसवण्यास सज्ज आहेत. गोलमाल ज्युनिअरमध्ये लक्ष्मण, गोपाल, माधव आणि लकीची प्रँक गँग पाहायला मिळणार आहे.