ऐश्वर्या रायसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करणार ‘कटप्पा’

aishwarya-roy
एसएस राजमौली यांच्या ‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ या चित्रपटात दाक्षिणात्य स्टार सत्यराज संपूर्ण देशात केवळ कटप्पाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाले होते. लोकांनी सत्यराज यांनी साकारलेली कटप्पाची भूमिका इतकी डोक्यावर घेतली की, कधी नव्हे इतकी लोकप्रियता सत्यराज यांना मिळाली. आता ऐश्वर्या राय बच्चन ऑनस्क्रिन रोमान्स करताना कटप्पाची भूमिका साकारणा-या याच सत्यराज यांच्यासोबत दिसणार आहे.

सत्यराज यांची मणिरत्नम यांच्या ‘पोन्निनी सेल्वम’ या आगामी चित्रपटात एन्ट्री झाली आहे. ऐश्वर्या राय या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याचे कळते आणि सत्यराज ऐश्वर्याच्या पतीची भूमिका साकारणार, अशी चर्चा आहे. एका राजकुमारीच्या भूमिकेत या चित्रपटात ऐश्वर्या झळकणार आहे. तिचे एका राजासोबत लग्न होते. पण राजकुमारी या लग्नाचा वापर केवळ आपल्या इच्छापूर्तींसाठी करते. या चित्रपटाची कथा एका तामिळ कादंबरीवर बेतलेली आहे.

ऐश्वर्यासोबत तिचे सासरे अमिताभ बच्चन हेही मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्निनी सेल्वम’मध्ये दिसू शकतात. अर्थात अमिताभ आपल्या बिझी शेड्यूलमुळे अद्याप या चित्रपटाला होकार देऊ शकलेले नाहीत. याआधी अभिनेते मोहनबाबू ‘पोन्निनी सेल्वम’मध्ये ऐश्वर्याच्या पतीची भूमिका साकारणार अशी चर्चा होती. या चित्रपटासाठी त्यांनी होकार दिल्याचेही म्हटले गेले होते. पण आता कदाचित त्यांच्याजागी सत्यराज यांची वर्णी लागली आहे.

Leave a Comment