लेक्ससची पहिली एमपीव्ही एलएम पेश

lexus
शांघाई मोटार शो २०१९ मध्ये लेक्सस कंपनीने त्यांची पहिली एमपीव्ही एलएम पेश केली असून ती फक्त चीन व काही निवडक आशियाई बाजारात विकली जाणार आहे. या कारची दोन व्हेरीयंट सादर केली गेली आहेत. त्यातील एक एलएम ३५० असून दुसरे एलएम ३०० एच हे आहे. ही कार पॅरंट कंपनी टोयाटोच्या अल्फार्ड वर आधारित असल्याचे दिसून येत आहे.

lm350
नवी एलएम टिपिकल बॉक्स डिझाईनची असली तरी त्यावर खास लेक्सस टच स्पष्ट दिसून येत आहे. अपफ्रंट ब्रांड सिग्नेचर ग्रील क्रोमसह असून दोन्हीकडे एलइडी हेडलँप आहेत. एल शेपचा फॉल लँप दिला गेला आहे तर दुसरीकडे एलएम कंपनीने खिडक्याच्या चारी बाजूच्या साईड स्कर्ट वर क्रोम स्ट्रीप दिल्या आहेत. टेललाईट एलइडीचा आहे. ब्लॅक व व्हाईट पर्ल क्रिस्टल साईन कलर मध्ये या कारची ४ सीटर व ७ सीटर मॉडेल आहेत.

कारला टचस्क्रीन कंट्रोल पॅनल, सीट, क्लायमेट कंट्रोल, ऑडीओ कंट्रोल फिचर असून २६ इंची डिस्प्ले, १ रेफ्रिजरेटर, छत्री साठी खास स्टोरेज एरिया दिला गेला आहे. एलएम ३५० साठी ३.५ लिटरचे पेट्रोल इंजिन ८ स्पीड ऑटोमेटीक गिअर सह आहे तर एलएम ३०० एच साठी २.५ लिटरचे पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक मोटर सह दिले गेले आहे.

Leave a Comment