रशियाच्या राष्ट्रपती भवनाची सुरक्षा ससाणे आणि घुबडाकडे

sasana
कोणत्याची देशाच्या पंतप्रधान अथवा राष्ट्रपती या सारख्या महत्वाच्या निवासस्थानांची सुरक्षा कमांडो किंवा आर्मी जवान करतात असे दिसते. मात्र जगात एक देश असाही आहे कि जेथे राष्ट्रपती भवनाची सुरक्षा बहिरी ससाणे आणि घुबडे यांच्याकडे आहे. हा देश जगात पॉवरफुल देश मानला जातो. हा देश आहे रशिया आणि रशियाचे पॉवरफुल राष्ट्रपती पुतीन यांच्या मॉस्को क्रेम्लीन येथील राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेत सशस्त्र गार्ड बरोबरच ससाणे आणि घुबडे रक्षा मंत्रालयाच्या सुरक्षा टीम मध्ये आहेत. शिकारी पक्षांचा हा ताफा राष्ट्रपती भवन आणि आसपासच्या सरकारी इमारतींची सुरक्षा करतो. अर्थात मानवी शत्रू पासून नव्हे तर कावळे आणि अन्य उपद्रवी पक्षांनी या सुंदर इमारती शीटून घाण करू नयेत यासाठी हे पक्षी दल काम करते.

cremlin
मिळालेल्या माहितीनुसार कावळ्यांनी येथे घाण करू नये तसेच घरटी बांधू नयेत म्हणून बहिरी ससाणे आणि घुबडांना खास प्रशिक्षण दिले गेले असून १९८४ मध्येच त्याचे हे पथक तयार केले गेले आहे. सध्या या टीम मध्ये १० पेक्षा अधिक पक्षी आहेत. हे पक्षी दल सदैव जागृत असते आणि इमारत परिसरात येणारया कावळ्यांना पळवून लावते. या टीम मध्ये २० वर्षाची मादा ससाणा असून तिचे नाव अल्फा आहे. त्याचबरोबर फाईल्या नावाचे घुबड आहे. हे दोन्ही पक्षी कावळ्याचा नुसता आवाज आला किंवा कावळे आकाशात घिरट्या घालताना दिसले तर क्षणात त्यांना पकडून ठार करतात किंवा पिटाळून लावतात.

ullu
अलेक वालासोव या संदर्भात माहिती देताना म्हणाले पूर्वी कावळे हाकलून लावण्यासाठी गार्ड होते तसेच ससाण्याचे आवाज टेप करून ते लावले जात पण त्याने काम साधेना त्यामुळे बहिरी ससाणे आणि घुबडे आणली गेली. फाईल्याचे प्रशिक्षक डेनिस सांगतात, रात्रीच्या वेळी हे घुबड शांत राहून कावळ्यांची शिकार साधते. कावळ्यांची संख्या जास्त असली तरी हे एकटेच त्यांचा समाचार घेण्यास पुरेसे आहे. त्याचे डोळे रात्री चांगले पाहू शकतात आणि त्याची मान १८० अंशात वळते त्यामुळे बसल्या जागी ते मागचे पाहू शकतात.

या पक्षी दलाला आता आणखी खास प्रशिक्षण दिले जात असून त्यात राष्ट्रपती भवन अथवा आसपासच्या महत्वाच्या इमारत परिसरात एखादे ड्रोन आले तरी हे पक्षी ते पाडू शकणार आहेत.

Leave a Comment