पॅनासोनिकने बनविला जगातला पहिला पारदर्शी टीव्ही

vitrin
जगभर विविध कंपन्या आता स्मार्ट टीव्ही बनवू लागल्या आहेत आणि मोठ्या संख्येने ग्राहकांनी ते घ्यावेत यासाठी त्यांच्या किमती स्पर्धात्मक ठेवल्या जात आहेत. स्मार्ट टीव्ही मध्ये अनेक डिझाईन पेश केली जात असताना पॅरीस मध्ये नुकत्याच पार पडलेल्या मिलान डिझाईन विक मध्ये पॅनासोनिकने जगातील पहिला पारदर्शी (ट्रान्स्परंट) टीव्ही सादर केला आहे. ओलेड स्कीनचा हा टीव्ही व्हीट्रीन नावाने सादर केला गेला आहे.

हा टीव्ही एरव्ही काचेच्या कपाटासारखा दिसतो. तो रुंद लाकडी फ्रेममध्ये बसविला गेला आहे आणि वापरात नसेल तेव्हा लिविंग रूम मध्ये सजावटीसाठी वापरता येतो. हा टीव्ही ऑन केला कि त्याचा स्क्रीन ओलेड डिस्प्ले मध्ये बदलतो. टीव्हीचे तांत्रिक भाग लाकडी फ्रेम मध्ये खुबीने बसविले गेले आहेत. ही वुडन फ्रेम टीव्ही स्टँड सारखी काम करते. त्याचे लायटिंग युजरच्या डोळ्यांना सुखद अनुभव देते.

पॅनासोनिक आणि व्हीट्रीन यांनी दोन वर्षापूर्वीच या कन्सेप्टवर काम सुरु केले होते. ऑडिओ व्हिज्युअल उपकरण लिविंग रूम मध्ये अधिक चांगल्या प्रकारे कसे वापरता येईल यावर त्यामध्ये विचार केला गेला. व्हिट्रीन तर्फे सांगितले गेले की आमच्या या तंत्रामुळे निष्क्रिय वस्तू जिवंत व गतिशील वस्तुत बदलली गेली आहे. त्यामुळे त्याकडे पाहण्याचा नजरिया बदलला आहे. कला आणि डिझाईन याचा हा उत्तम नमुना आहे. अर्थात हा टीव्ही बाजारात कधी येणार ते अजून जाहीर केले गेलेले नाही. सध्या हा पारदर्शी टीव्ही टोक्योतील पॅनासोनिक न्यू शो प्लेस मध्ये ठेवला जात आहे.

Leave a Comment