उर्जित पटेलांनी यामुळे दिला राजीनामा – जयंत पाटील

jayant-patil
बुलडाणा – भारतीय रिर्झव्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेचे साडेतीन लाख रुपये मागितल्याने दिला. मोदी सरकारने त्यानंतर ज्याला अर्थशास्त्राचे ज्ञान नाही अशा इतिहासतज्ञाला भारताचा गव्हर्नर केले, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली.

देशावर स्वातंत्र्य मिळाल्यापासून २०१४ पर्यंत ५१ लाख कोटी रुपये कर्ज होते. तर देशावर आता ८२ लाख कोटी कर्ज झाले. म्हणजे देशावर ३१ लाख कोटी कर्ज या पाच वर्षात मोदींनी केले. मोदींनी हा खर्च कुठे केला याचा हिशोब देशाला द्यावा असेही ते म्हणाले. जयंत पाटलांनी यावेळी नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अमित शहा यांच्या निवडणूक पूर्वीचे मागील आणि आताचे व्हिडिओ दाखवत प्रचार केला.

जयंत पाटील खामगावात बुलडाण्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी मंचावर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, रविकांत तुपकर, अॅड. नाजेर काझींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment