यूएईच्या संघाकडून धमाकेदार प्रदर्शन करत आहे हा हरियाणवी खेळाडू

aryan-lakra
आयसीसी १९ वर्षाखालील संघात आशिया चषक स्पर्धा सध्या मलेशिया येथे सुरू असून असून एका युवा खेळाडूने या स्पर्धेत धमाकेदार प्रदर्शन करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यूएईच्या १९ वर्षाखालील संघाचा आर्यन लाकरा हा कर्णधार असून तो अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिध्द आहे. त्याच्या संघाचा सामना सोमवारी कुवेतच्या संघासोबत झाला होता. त्याने त्या सामन्यात १० षटकात २२ धावा देत ५ गडी बाद करत कुवेतच्या संघाचे कंबरडे मोडून काढले. कुवेतचा संघ या जादुई फिरकी गोलंदाजीमुळे अवघ्या ५६ धावांवर बाद झाला. हा सामना यूएईने ८ व्या षटकात जिंकला.

१३ डिसेंबर २००१ साली हरियाणाच्या सोनीपत येथे आर्यन लाकरा याचा जन्म झाला आहे. त्याने वयाच्या १४ व्या वर्षी यूएई क्रिकेट बोर्डच्या कॅम्पमध्ये भाग घेत चांगली कामगिरी करुन दाखविली. त्यानंतर त्याला यूएईच्या संघात घेत कर्णधाराची जबाबदारीही दिली. यूएईच्या संघात इतरही भारतीय खेळाडू आर्यनसोबत आहेत, ज्यांचा जन्म भारतात झाला आहे. यात चेन्नईचा विरिथिया अरविंद, नवी दिल्लीचा अंश टंडन, केरळचा अलीशान शराफू आणि चेन्नईचा कार्तिक मयप्पन हे खेळाडू यूएईच्या संघात चमकदार कामगिरी करत आहेत.

Leave a Comment