19 एप्रिलला प्रदर्शित होणार सही है नोटबंदी

sahi-hai-notebandi
पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाला निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर स्थगिती दिली आहे. त्यातच आता मुस्कान प्रॉडक्शन आणि दिग्दर्शक बाळासाहेब गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी निर्णयामुळे प्रेरित होऊन सही हैं नोटबंदी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नोटबंदीच्या दरम्यान झालेल्या चांगल्या वाईट घटनांचे चित्रीकरण या चित्रपटात करण्यात आले आहे.

हा चित्रपट येत्या 19 एप्रिलला रिलीज होणार प्रदर्शित होणार असल्याचे बाळासाहेब गोरे यांनी मुंबईत मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेतत सांगितले. भाजप निवडणुकीच्या काळात प्रचाराला बंदी असताना अप्रत्यक्षपणे कोणत्या ना कोणत्या मार्गे आपला प्रचार करताना दिसत आहे. हा त्यातीलच एक चित्रपट आहे, पंतप्रधान मोदी यांचा फोटो या चित्रपटाच्या पोस्टरवर लावला असून यावर काही पक्षांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटावर आता निवडणूक आयोग काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment