यूट्यूबवर दिसेनासा झाला मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर

PM-Modi
देशात सध्या 17व्या लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. त्यातच या चित्रपटाच्या टीमला आता आणखी एक धक्का बसला आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही आता यूट्यूबवरून गायब झाला आहे.

या बायोपिकचे नाव यूट्यूब किंवा अन्य कोणत्याही साईटवर सर्च केल्यास हा व्हिडिओ उपलब्ध नसल्याचा मजकूर दिसत आहे. आतापर्यंत अनेक अडथळे चित्रपटाच्या मार्गात आले. हा चित्रपट सुरुवातीला २९ मार्चला रिलीज होणार होता, पण चित्रपट सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने ५ एप्रिलला रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर चित्रपटाविरोधात दाखल याचिकेमुळे ही तारीख ११ एप्रिलवर ढकलण्यात आली. पण हा चित्रपट निवडणुकांच्या काळात रिलीज झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल, असे म्हणत निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली.

आता या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यबूवरून हटवण्यामागील नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अभिनेता विवेक ओबेरॉय चित्रपटात नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. आता चित्रपटाच्या मार्गातील अडथळे कधी दूर होणार, हे पाहणे येणार काळच सांगेल.

Leave a Comment