‘या’ दिवशी रिलीज होणार मेंटल है क्या ?

mental-hai-kya
अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘मेंटल है क्या’ चित्रपटाचे पहिले पोस्टर गेल्यावर्षी मार्च महिन्यात रिलीज करण्यात आले होते. प्रेक्षकांना हे पोस्टर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट हटके असणार याची खात्री आहे. त्यातून या चित्रपटात बॉलिवूडचे दोन आघाडीचे स्टार असल्यामुळे ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहे. मार्च महिन्यात कंगनासोबत राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट रिलीज होणार होता. पण कंगनाच्या सांगण्यावरून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख आता समोर आली आहे.


‘मेंटल है क्या’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ट्विटरद्वारे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितली आहे. आता २१ जून २०१९रोजी मार्च महिन्यात प्रदर्शित होणारा ‘मेंटल है क्या’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे याआधी पोस्टर रिलीज करण्यात आल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

एकता कपूरने या चित्रपटाची निर्माती केली असून हा चित्रपट सायकोलॉजिक थ्रिलर असणार आहे. कंगना आणि राजकुमार दोघेही या चित्रपटातून पूर्वीपेक्षा नव्या अवतारात आणि नव्या ढंगात दिसणार आहेत. कंगनाने राजकुमारबरोबर ‘क्वीन’ हा चित्रपट केला होता. दोघांच्याही बॉलिवूडमधील करिअरला हा चित्रपट कलाटणी देणारा ठरला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

Leave a Comment