विश्वचषकासाठी पंत, रायडू आणि सैनी स्टँडबाय

combo
नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून निवड समितीने यातील तीन स्टँडबाय खेळाडूंची नावे बुधवारी जाहीर केली. अंबाती रायडू, ऋषभ पंत आणि नवदीप सैनी यांच्या नावांचा यात समावेश आहे. जर एखाद्या खेळाडूला विश्वचषकाच्या दरम्यान दुखापत झाली तर इंग्लंडला या तिघांपैकी कोणालाही पाठवले जाऊ शकते.

रायडू आणि पंतचा संघांमध्ये समावेश होण्याची शक्यता भारतीय संघाच्या निवडीआधी व्यक्त केली जात होती. पण, अंतिम 15 मध्ये या दोघांनाही स्थान मिळाले नाही. स्टँडबाय खेळाडू म्हणून दिल्लीकडून खेळणाऱ्या नवदीप सैनीला निवडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याने दिल्लीसाठी चांगला खेळ केला असला तरी पण तो आयपीएलमध्ये धडपडत आहे. वेगवान गोलंदाजी करणारा नवदीप सैनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळतो.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक

Leave a Comment