ही स्टारकिड्स प्रथमच करणार मतदान

anannya
देशात ११ एप्रिल पासून लोकसभेच्या मतदानाची सुरवात झाली असून सात टप्प्यात होणारया या मतदानाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. या टप्प्यात काही बॉलीवूड सेलेब्रिटींची मुले प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यातील काहीजण मुंबईत तर काही दिल्लीत मतदान करणार आहेत.

khushi
बिगबी अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची कन्या नव्या नवेली आता २२ वर्षांची असून ती प्रथमच लोकसभेसाठी मतदान करणार आहे. ती दिल्लीवासी असल्याने दिल्लीतून मतदान करणार आहे. कपूर खानदानातील तीन कन्या म्हणजे बोनी कपूर यांच्या मुली जान्हवी आणि ख़ुशी तसेच संजय कपूर यांची कन्या शनाया मुंबईतून मतदान करणार आहेत तर आमीर खान यांची मुलगी इरा २२ वर्षाची असून तीही प्रथमच मतदान करणार आहे.

suhana
किंग खानचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना अनुक्रमे २१ आणि १८ वर्षांचे आहेत आणि ते दोघेही प्रथम मतदान करणार आहेत. चंकी पांडेची कन्या आणि उभरती स्टार अनन्या पांडे प्रथम मतदान करणार आहे. सुहाना, अनन्या आणि शनाया बेस्ट फ्रेंड्स आहेत. अमृता आणि सैफ अली खान यांचा मुलगा इब्राहीम अली खान प्रथमच मतदान करण्यासाठी पात्र झाला असला तरी तो मुंबईत नाही त्यामुळे मतदान करणार का नाही हे समजू शकलेले नाही.

pujabedi
पूजा बेदी हिची कन्या २१ वर्षीय आलीय फर्निचरवाला यंदा प्रथमच मतदान करत आहे. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात यंदा ८ कोटी ४० लाख नवे मतदार आहेत. मुंबईत २९ तारखेला मतदान होत आहे.

Leave a Comment