ट्विटर सीईओ जॅक डोर्सीचा फिटनेस फंडा

dorcy
ट्विटर या सोशल साईटचा सीइओ जॅक डोर्सी या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहतो. नुकताच त्याने गेल्या वर्षात फक्त ९६ रुपये म्हणजे महिन्याला ८ रु. पगार घेतल्याची चर्चा सुरु आहेच. त्यात आता त्याच्या डायट प्लान मुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. काही लोकांनी त्याला त्याच्या डायट वरून ट्रोल केले आहे तर काहींनी त्याची वाहावा केली आहे. सोशल मिडीयावर त्याने त्याचे डायट संदर्भातली माहिती दिली आहे. फिटनेस पर्सनॅलीटी बेन ग्रीनफिल्ड सह पोडकॉस्ट मध्ये डोर्सीने हि माहिती दिली आहे.

डोर्सीच्या म्हणण्यानुसार दिवसातले २२ तास तो काहीच खात नाही. २२ तासानंतर तो एकदाच जेवण घेतो. त्यात मांस, मासे, हिरव्या भाज्या आणि फळे यांचा समावेश असतो. त्याच्या लाइफस्टाइलचे वेगळेपण असे की तो विकेंडला काम करतो. शनिवार रविवार तो अजिबात जेवत नाही तर हे दोन्ही दिवस तो नुसते पाणी पिऊन राहतो. शारीरिक आरोग्याप्रमाणे तो मानसिक आरोग्याची काळजी घेतो आणि डोके शांत राहावे म्हणून रोज १५ मिनिट बर्फाच्या पाण्याने नाहतो. त्याच्या म्हणण्यानुसार स्वतःला ही एक प्रकारची शिक्षा आहे पण त्यामुळे काम करण्याची क्षमता वाढते असा त्याचा अनुभव आहे. तो म्हणतो कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे मन हेच मुख्य साधन आहे. १० मिनिटात तो गाढ झोपू शकतो. ब्रेकफास्ट, लंच, डिनर न घेतल्याने दिवस मोठा वाटतो. अनेक जण माझी लाइफस्टाइल अनियमित आणि अयोग्य आहे असे म्हणतात पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

डोर्सी त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या नेहमी पुढे राहावे यासाठी खूप काम करतो, मेहनत घेतो आणि त्यातूनही शांत राहता यावे यासाठी रोज दोन तास मेडिटेशन करतो. डोर्सीची संपत्ती कोट्यावधी रुपयांची आहे मात्र म्हणून आयुष्य मजेत जगावे असे त्याला वाटत नाही. कठोर मेहनत आणि करत असलेल्या कामात पूर्ण समर्पण हेच त्याला जास्त महत्वाचे वाटते.

Leave a Comment