मुंबई : तब्बल 325 अरब रुपयांना भारताचा एक ब्रॅण्ड विकत घेण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी ‘वॉलमार्टने’ ते नाव एवढे किंमती होते की त्याच्यासाठी 325 अब्ज रुपये मोजले आहेत. ‘फ्लिपकार्ट’ असे ते नाव आहे. भारतातील सर्वात मोठी रिटेल कंपनी ‘फ्लिपकार्ट’ आहे आणि नुकतीच या कंपनीची मालकी ‘वॉलमार्ट’कडे आली आहे.
१ हजार १०६ अब्ज रुपये एवढी ‘वॉलमार्ट’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांच्यात झालेल्या सौद्याची एकूण किंमत होती. पण टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप न्यूज पोर्टलच्या रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की, ‘वॉलमार्ट’ने दाखल केलेल्या आपल्या वार्षिक 10-के फाइलमध्ये नमूद केले की, 325 अब्ज रुपये या सौद्यात ‘फ्लिपकार्ट’चे नाव खरेदी करण्यासाठी दिले गेले. यूएसमध्ये नोंदणी केलेल्या सर्व कंपन्यांसाठी 10-के दाखल करणे अनिवार्य आहे.
या फाइलिंगनुसार, ही किंमत ‘फ्लिपकार्ट’ आणि त्यासंबंधित सर्व ब्रँडच्या नावांची विकत घेण्यासाठी दिली गेली. अशा प्रकारे, ‘फ्लिपकार्ट’चे एकमेव नाव खरेदी करण्यासाठी ‘वॉलमार्ट’ने एवढी मोठी रक्कम दिली. याचा अर्थ ‘फ्लिपकार्ट’चे एकूण मूल्य 30% केवळ त्याच्या नावावर आहे.